Thursday, July 23, 2020


खंत !!

खंत ही जीवा, का बदलली ही हवा,
ऱ्हास हा मृदाचा, कळ लावी जीवा!


खंत ही मनी, का वृक्ष तोडले वनी?
ऐश्वर्याची खणी, का नष्ट केली कुणी?

खंत ही जनी, कुठे थुंकले कोणी,
आरोग्य मानवाचे, दावी लाविले त्या क्षणी!

खंत ही कि खोदिले, पर्वत कठीण सारे,
रहाण्या मानवा, नको हस्तक्षेप फुका रे!

खंत ही कि सागरा, दूर सारी मानव,
भर घालूनी सारखी, बिघडवी साखळी जैव!

खंत ही सतत, ओरबाडले निसर्गा,
संपवूनी संसाधने, गोंजारती गर्वा!!

खंत ही ध्यानी, कुठे चालला माणूस प्राणी,
पुढच्या पिढीचा, ना विचार कुठेही मनी?
 

डॉ. सौ. जया  कुऱ्हेकर, 
GREEN BLOGGER