About Us

नमस्कार माझ्या प्रिय मित्र मैत्रीणींनो,

मी डॉ.जया कु-हेकर, आज आम्ही नुकतेच सुरु केलेल्या माझ्या "Jaya's Green" या डिजीटल उपक्रमाविषया संदर्भात माहिती देण्याकरिता हा लेख प्रपंच.

आजचं युग हे माहिती आणि तंत्रज्ञानाचं युग आहे. आपण आणि सगळं जगच एकमेकांच्या खूप जवळ आलो आहोत. पृथ्वीच्या एका टोकावर असलेली व्यक्ती ही पलीकडच्या हजारो मैल लांब असलेल्या टोकावरील व्यक्तीशी क्षणार्धात बोलू शकते. आपण एके काळी एखादे पत्र पोचण्याची दिवस अन दिवस वाट पाहायचो, ते आता डोळ्यांचे पाते लवते न लवते तोपर्यंत प्रेषिताच्या मेजावर जाऊन धडकलेले असते! ही ह्या तंत्रज्ञानांची कमाल आहे! विश्वास बसू नये एवढी ह्या क्षेत्रात प्रगती झाली आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात ही ह्या तंत्रज्ञानाने खूप क्रांती केली आहे!

जगाच्या कुठल्याही छोट्याश्या गावात झालेले संशोधन आपल्याला लगेच कळते, त्याचा जगभर उहापोह होतो आणि त्याला योग्य ती शाबासकीही मिळते, तसंच चुका ही ताबडतोब निदर्शनास येतात. हे एक अतिशय संवेदनशील माध्यम आहे! ह्या माध्यमामुळे मी आज अश्या परिस्थितीतही तुमच्या पर्यंत पोहचू शकते आहे.

मला भावलेल्या, सध्या चर्चेत असलेल्या, तुमच्यासाठी मला आवश्यक वाटत असलेल्या, अनेक विषयांवर मी गेले वर्षभर माझ्या "Jaya's Green" वेबपोर्टल वर ब्लॉग स्वरुपात सातत्याने लिखाण करीत आहे. ते तुम्ही वाचत ही आहात आणि जर वाचलं नसेल तर जरूर www.JayasGreen.in ह्या माझ्या संकेतस्थळाला भेट द्या. तसेच मी यूट्यूब च्या माध्यमातून ही तुमच्याशी हितगुज करणार आहे, तरी माझ्या यूट्यूब चॅनेलला भेट द्या.

तुम्हाला एखाद्या विषयावर माझ्याकडून काही विशिष्ठ माहिती हवी असेल तर ते ही त्याच्यामध्ये लिहा, मी जरुर ती सांगण्याचा प्रयत्न करीन.चला तर मग, भेटत राहूया..धन्यवाद..!